लाहोर : मुंबई हल्ला प्रकरणी पाकिस्तानच्या सरकारी पक्षाला आज शरमेने मान खाली घालावी लागली आहे. या प्रकरणी प्रमुख साक्षीदाराने आपली साक्ष बदलली आणि म्हटला हल्ल्यानंतर जिवंत पकडण्यात आलेला आणि फाशी देण्यात आलेला एकमेव बंदुकधारी अजमल कसाब जिवंत आहे.
कोर्टाच्या एका अधिकाऱ्याने सांगिले की 'फरिदकोटच्या प्राथमिक विद्यालयाचे हेडमास्टर मुदस्सिर लखवी यांनी कोर्टात सांगितले की त्यांनी कसाबला शिकविले आहे, पण तो जिवंत आहे. अजमल कसाब या शाळेत तीन वर्ष शिकला होता.
अडियाला जेल रावलपिंडीमध्ये दहशतवाद विरोधी कोर्टात इस्लामाबादचे न्यायाधिशांसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. काल परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाक पंतप्रधानांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांच्या बैठक झाली. त्यावेळी मुंबई हल्ल्याची सुनावणी लवकरात लवकर करून निकाल लावण्यासंदर्भात पाऊल उचलत असल्याचे सांगितले होते.
पण अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'हेडमास्तरांचा अजमल कसाब जिवंत असल्याचा दावा शरमेने मान खाली घालविणारा होता. हेडमास्तरांना अजमल कसाब कोणत्या कालावधीत शाळेत शिकत होता, याचे रेकॉर्ड सादर करण्याचे सांगितले होते पण ते इतर गोष्टींवरच बोलत होते. सरकारी पक्षही त्यांच्याकडून योग्य पद्धतीने माहिती काढण्यात अपयशी ठरला.
अधिकाऱ्याने सांगितले की हेडमास्तर हे आरोपी जकीउर रहमान लखवी यांच्या शहरात राहतात अशी शक्यता आहे की लखवी याने त्यांच्यावर दबाव टाकला असले. मे २०१४ मध्ये हेडमास्तरांनी सांगितले की कसाब अजूनही जिवंत आहे. सरकारी साक्षीदार पलटल्यामुळे त्या साक्षिदाराची पुन्हा चौकशीची मागणी केली होती. पण तो आपल्या जबाबावर कायम राहिला आणि सांगितले कसाब अजून जिवंत आहे...
हेडमास्तरांनी (भारतात फाशी देण्यात आलेल्या) कसाबचा कोणताच संदर्भ दिला नाही. किंवा त्याचा उल्लेख केला, भारतात हल्ला करणारा आणि शाळेत शिकणारा कसाब एकच होता. या प्रकरणाची सुनावणी १६ डिसेंबर रोजी होणार आहे.
कसाब आणि इतर ९ जणांनी मुंबईवर २६/११ रोजी हल्ला करून १६६ जणांचे प्राण घेतले होते. त्यानंतर कसाबला मुंबईत पकडण्यात आले. आणि २०१२ मध्ये त्याला पुण्यातील येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.