झ्युरिक : एक कार १०० टन इतके वजन असलेली ट्रेन ओढून चालवू शकेल असं कधी पाहिलय का तुम्ही? या गोष्टीवर तुमचाही विश्वास बसणार नाही पण अस खरंच घडलय.
कोणती आहे ही कार
स्वित्झर्लंडमध्ये जॅग्वार लँड रोव्हर डिस्कव्हरी स्पोर्ट्स कारने तब्बल १०० टनहून अधिक वजन असलेल्या ट्रेनला खेचून अख्खा पूल पार केला.
या स्पोर्टी कारच्या जाहिराती करिता कंपनीने हे शूट केले आहे. हे शूटिंग स्वित्झर्लंडमधील राईन नदीवर असलेल्या हेमिशॉफेन या पुलावर झाले आहे.
ही जाहिरात कारची टोविंग पॉवर म्हणजेच कोणतीही गोष्ट खेचण्याची शक्ती किती आहे हे दाखविण्यासाठी केलीये.
हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल