जपानमध्ये ८.५ तीव्रतेचा भूकंप, दिल्ली परिसरातही भूकंपाचे हलके झटके

जपानमध्ये आज सायंकाळी पाच वाजून सहा मिनिटांनी शक्तीशाली ८.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरा दिला. या भूकंपाचे झटके दिल्ली आणि एनसीआरमध्येही जाणवले. 

Updated: May 30, 2015, 06:11 PM IST
जपानमध्ये ८.५ तीव्रतेचा भूकंप, दिल्ली परिसरातही भूकंपाचे हलके झटके title=

नवी दिल्ली : जपानमध्ये आज सायंकाळी पाच वाजून सहा मिनिटांनी शक्तीशाली ८.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरा दिला. या भूकंपाचे झटके दिल्ली आणि एनसीआरमध्येही जाणवले. 

या भूकंपामुळे जपानच्या प्रशासनाने सुनामीची चेतावनी दिलेली नाही. 

अमेरिकन भूगर्भीय सर्वेनुसार भूकंपाचा केंद्र बिंदू टोकियोपासून ८७४ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिचिशिमा येथे आहे. 

एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार भूकंपाच्या झटक्यांनी राजधानी टोकियोतील अनेक इमारती एक मिनीटापेक्षा अधिक काळ हालत होत्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.