रिओ द जनेरो : ब्राझीलच्या संसदेत सुधारणांसंबंधी सुरू असलेल्या चर्चेवेळी आपल्या मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्या जोओ रॉड्रीगज या खासदार महोदयांना कॅमेऱ्याने कैद केले आहे.
ब्राझीलच्या सत्ताधारी सोशल डेमोक्रॅटीक पार्टीच्या खासदाराला चर्चा सुरू असताना आपल्या डेस्कच्या खाली मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहताना कॅमेऱ्याने शूट केले.
या संदर्भात फेसबूकवर स्पष्टीकरण देताना खासदार महोदय म्हणाले की, मला हा व्हिडिओ कोणी तरी व्हॉट्सअॅपवरून पाठविला होता. मी तो मेसेज डिलीट करत होतो. त्याच वेळी माझे शुटींग करण्यात आले.
असाच प्रकार फेब्रवारी २०१२ मध्ये कर्नाटक विधानसभेत घडला होता. सत्ताधारी भाजपचे तीन आमदार पॉर्न व्हिडिओ पाहताना कॅमेऱ्यात कैद झाले होते.
पाहा तो व्हिडिओ