माजी राष्ट्रपतींना भररस्त्यात शर्टाला धरत खेचून कोर्टात आणलं...

सगळ्या जगाचं लक्ष सध्या मालदीवकडे वळलंय... ते इथल्या माजी राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या वागणुकीमुळे... 

Updated: Feb 25, 2015, 05:10 PM IST
माजी राष्ट्रपतींना भररस्त्यात शर्टाला धरत खेचून कोर्टात आणलं... title=

माले : सगळ्या जगाचं लक्ष सध्या मालदीवकडे वळलंय... ते इथल्या माजी राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या वागणुकीमुळे... 

मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांच्याविरुद्ध दहशतवादविरोधी कायद्यान्वये खटला दाखल करण्यात आलाय. सोमवारी नशीद यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं... यावेळी, न्यायालयात जाताना नशीद नाटकीय पद्धतीनं अचानक वार्ताहारांसमोर थांबले होते. यावेळी, विशेष अभियानाच्या अधिकाऱ्यांना त्यांना जबरदस्तीनं न्यायालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.... तेव्हा ते जमिनीवर पडेल... यावेळी, त्यांचा शर्टही फाटला... यावेळी, ते आपण स्वत: चालत जाऊ शकतो, असं वारंवार सांगत होते, असं स्थानिक मीडियानं म्हटलंय.  

यावेळी, सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना भर रस्त्यावरून खेचत, घसरवत नेण्यात आलं. इतकंच नाही तर, या खेचाखेचीत त्यांचे कपडेही फटले.

उल्लेखनीय म्हणजे, नशीद यांनी यापूर्वी फेब्रुवारी २०१३ मध्ये भारतीय दूतावासाची शरण घेऊन आपला जीव वाचवला होता. ४७ वर्षीय नशीद यांना २०१२ मध्ये कथित स्वरुपात एका विरिष्ठ न्यायाधिशाला अटक करण्याचा आदेश देण्याच्या प्रकरणात दरशतवाद विरोधी कायद्यान्वये रविवारी अटक करण्यात आली होती. 

मोहम्मद नशीद हे मालदीवचे लोकशाही पद्धतीनं निवडून आलेले पहिले राष्ट्रपती होते. अत्यंत अपमानास्पद आणि क्रूर वागणुकीसोबत नशीद हे कारवाईत जखमी झाल्यानं त्यांना हॉस्पीटलमध्ये नेण्यात आलं.

मालदीवच्या सुरक्षा दलाच्या या कारनाम्याची सगळ्या जगानं निंदा केलीय. भारतानंही या घटनेचा निषेध नोंदवलाय. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.