नवी दिल्ली : फेसबूकचा तरुण सीईओ मार्क झुकेरबर्ग हा याच महिन्यात दिल्लीत येणार आहे.
सोशल मीडियातील अग्रगण्य नेटवर्किंग साइट फेसबूकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकेरबर्ग २८ ऑक्टोबरला दिल्लीत येत आहेत. झुकेरबर्ग यांने फेसबूकवर याची पोस्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच सप्टेंबर महिन्यात कॅलिफोर्नियामध्ये फेसबूक मुख्यालयाला भेट दिली होती.
झुकरबर्ग भारतीयांशी संवाद साधण्यासाठी आयआयटी दिल्लीच्या टाऊन हॉलमध्ये प्रश्नोत्तरात सहभागी होतील. सोशल मीडियावर भारतीय लोक सगळ्यात सक्रिय आणि जोडले गेलेला समुदाय असल्याचे झुकरबर्ग याने म्हटलेय. भारतात १३ कोटींपेक्षा जास्त लोक फेसबूकचा वापर करीत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.