भेटा, रिअल लाईफ 'बजरंगी भाईजान'ला!

सलमान खानचा बहुचर्चीत 'बजरंगी भाईजान' तुम्ही एव्हाना पाहिलाच असेल... सलमाननं रिल लाईफमध्ये जगलेली भूमिका चंदीगडच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं रिअल लाईफमध्ये जगलीय. 

Updated: Aug 1, 2015, 04:48 PM IST
भेटा, रिअल लाईफ 'बजरंगी भाईजान'ला! title=

नवी दिल्ली : सलमान खानचा बहुचर्चीत 'बजरंगी भाईजान' तुम्ही एव्हाना पाहिलाच असेल... सलमाननं रिल लाईफमध्ये जगलेली भूमिका चंदीगडच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं रिअल लाईफमध्ये जगलीय. 

आपल्या कुटुंबीयांपासून दूरावलेली केवळ ४ वर्षांची तन्वी दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच तिच्या घरच्यांना पुन्हा भेटलीय. 

चंदीगडच्या दोन पोलिसांना चार वर्षांची तन्वी सापडली तेव्हा तिचं घर कुठे असावं याबद्दल त्यांना कोणताच 'क्लू' नव्हता. असिस्टंट सब-इन्स्पेक्टर दिलबग सिंग यांनी आपल्यासोबत एका कॉन्स्टेबलला घेऊन या चिमुकलीच्या घराचा आणि कुटुंबीयांचा थांगपत्ता धुंडाळून काढण्यासाठी जंग-जंग पछाडलं... 

'बजरंगी भाईजान'प्रमाणेच, छोट्या तन्वीलाही आपलं घर नेमकं कोणत्या भागात आहे हे सांगता येत नव्हतं... किंवा आपल्या कुटुंबीयांची नावंही तन्वीला नीट सांगता येत नव्हती. 


'रिल लाईफ' बजरंगी भाईजान

त्यामुळे, तन्वीला तिच्या घरी सुखरुप पोहचवण्यासाठी सिंग यांनी शोधमोहीमचं उघडली. शाहीमाजरा, मदनपुरा आणि इतर भागांत त्यांनी शोधाशोध केली. तब्बल पाच तासांच्या शोधानंतर त्यांना मोहाली भागात असलेल्या तन्वीच्या कुटुंबीयांचा शोध लागला. 

तन्वीला ओळखणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी सिंग यांना वाल्मिकी कॉलनीमध्ये असणाऱ्या तन्वीच्या घरी नेलं... त्यानंतर सिंग यांनी तन्वीला तिच्या वडिलांकडे - रणबीर यांच्याकडे सोपवलं. 

अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कॉम्प्लेक्सच्या फेस १ मध्ये आधार कार्ड काढण्यासाठी गेलेल्या रणबीर यांचा हात पकडून तन्वी गेली होती. पण, गर्दीमध्ये तिचा हात सुटला आणि ती मागेच राहिली होती. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.