www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
संयुक्त राष्ट्र समितीच्या परिषदेत पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानातून होण्या-या वाढत्या अतिरेकी कारवायांप्रकरणी भारताने चिंता व्यक्त केली.
मुंबई हल्ल्यातील आरोपींवर कारवाई करण्याच आश्वासन शरीफ यांनी दिलंय. यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सीमापार दहशतवाद संपूष्टात आणण्यासाठी पाकने योग्य ती पावलं उचलावी असंही ठणकावून सांगितलं. यावेळी मुंबईत झालेल्या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानातून कट रचण्या-या दहशतवाद्यांवर योग्य ती कारवाई करावी असंही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितलं.
तर दुसरीकडे काश्मिर प्रश्न सोडविण्यासाठी शिमला कराराचा वापर केला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत विदेश मंत्री सलमान खुर्शिद, विदेश सचिव सुजाता सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन हजर होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.