नवी दिल्ली : समलिंगी संबंधांना मान्यता देणाऱ्या मेक्सिको सिटीच्या नावावर आता आणखी एका विक्रमाची नोंद झालीय.
मेक्सिकोमध्ये नुकताच एक अनोखा सामुदायिक विवाह सोहा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात तब्बल ५१ गे जोडपी विवाहबंधनात अडकली. महापौर मिगल अँजेल यांनी या सोहळ्याला हजेरी लावून नवविवाहित गे दाम्पत्यांना त्यांची मॅरेज सर्टिफिकेट्स वाटली. मेक्सिकोबरोबर पेरु, अर्जेंटिना, स्पेन आणि अमेरिकेतील गे जोडप्यांनीदेखील या विवाहसोहळ्यात आपलं शुभमंगल उरकून घेतलं.
२००९ सालीच समलिंगी विवाहांना मान्यता देत मेक्सिको लॅटिन अमेरिकेतलं पहिलं शहर बनलंय. २०१० पासून आजवर ६ हजार ९९ समलिंगी जोडप्यांनी विवाह केल्याची नोंद मेक्सिको सिटीच्या दफ्तरी आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्यानंतर मेक्सिकोला गे-फ्रेंडली सिटी अशी नवी ओळख मिळालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.