धोकेबाज पतीला धडा शिकवण्यासाठी पत्नीने घेतला असा बदला

आपल्या धोकेबाज पतीला धडा शिकवण्यासाठी लंडनमधील एका महिलेने वेगळाच फंडा वापरला. व्यवसायानिमित्त पती अमेरिकेला गेल्याने त्याच्या अनुपस्थितीत पत्नीने तिचे घर विकून टाकले आणि ती नवीन ठिकाणी राहायला गेली. घर विकण्याबाबत तिने आपल्या पतीला काही कळूही दिले नाही. पती अमेरिकेहून परत आल्यानंतर घराला लागलेले नवे टाळे पाहून तो चक्रावला.

Updated: Nov 23, 2015, 04:19 PM IST
धोकेबाज पतीला धडा शिकवण्यासाठी पत्नीने घेतला असा बदला title=
मिरर

लंडन : आपल्या धोकेबाज पतीला धडा शिकवण्यासाठी लंडनमधील एका महिलेने वेगळाच फंडा वापरला. व्यवसायानिमित्त पती अमेरिकेला गेल्याने त्याच्या अनुपस्थितीत पत्नीने तिचे घर विकून टाकले आणि ती नवीन ठिकाणी राहायला गेली. घर विकण्याबाबत तिने आपल्या पतीला काही कळूही दिले नाही. पती अमेरिकेहून परत आल्यानंतर घराला लागलेले नवे टाळे पाहून तो चक्रावला.

इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार, लंडनमध्ये राहणारा बिल्डर क्रेग अर्नोल्ड व्यवसायानिमित्त न्यूयॉर्कला गेला होता. त्यादरम्यान तो मोबाईल घरी विसरला. याचवेळी नेमका त्याच्या मोबाईलवर एका महिलेचा मेसेज आला. न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यावर क्रेगचा चांगल्या पद्धतीने पाहुणचार केला जाईल. त्याला निराश करणार नाही, असे त्या मेसेजमध्ये लिहीले होते. नेमका हा मेसेज क्रेगची पत्नी लॉराने वाचला.

मेसेज वाचल्यानंतर लॉराने आपल्या धोकेबाज पतीला धडा शिकवण्याचा ठरवले. जेव्हा क्रेग व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गेला असताना क्रेगची पत्नी लॉराने सर्व व्यवहार पूर्ण करुन घर विकून टाकले. जेव्हा क्रेग घरी परतला तेव्हा आपल्या घरी नव्या लोकांना पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्यावेळी आपल्या पत्नीने घर विकल्याचे त्याला समजले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x