शिष्टाचारीही असतात माकडे!

माकडापासूनच मानवाची उत्क्रांती झाली आहे. आणि विशेष म्हणजे माकडेही माणसासारखे अनेक शिष्टाचार पाळतात. त्यांना शिकवायची गरज नसते. मॅरमोसेट प्रजातीची माकडे ही अतिआदराने एकमेकांशी संभाषण करतात. मॅरमोसेट माकडे ही जगातील सर्वात छोटी माकडे असली तरी ती बुद्धिमान आहेत. त्यांची लांबी फक्त आठ इंच असते.या माकडांना आपण नेमके केव्हा बोलायचे आहे किंवा मध्येच बोलायचे नाही हे पण कळते. किमान ३० मिनिटे ते एकमेकांना पुरेसा वेळ देत असे संभाषण करू शकतात.

Updated: Oct 19, 2013, 08:26 PM IST

www.24taas.com, पीटीआय,वॉश्गिंटन
माकडापासूनच मानवाची उत्क्रांती झाली आहे. आणि विशेष म्हणजे माकडेही माणसासारखे अनेक शिष्टाचार पाळतात. त्यांना शिकवायची गरज नसते. मॅरमोसेट प्रजातीची माकडे ही अतिआदराने एकमेकांशी संभाषण करतात. मॅरमोसेट माकडे ही जगातील सर्वात छोटी माकडे असली तरी ती बुद्धिमान आहेत. त्यांची लांबी फक्त आठ इंच असते.या माकडांना आपण नेमके केव्हा बोलायचे आहे किंवा मध्येच बोलायचे नाही हे पण कळते. किमान ३० मिनिटे ते एकमेकांना पुरेसा वेळ देत असे संभाषण करू शकतात.
प्रिन्स्टन विद्यापीठातील आसिफ गझनफर यांनी सांगितले, की मॅरमोसेट माकडे ज्या अदबीने संभाषण करतात, किंबहुना त्यांच्यात एकमेकांविषयी जी सहकार्याची भावना असते ती पाहून आम्हालाच आश्चर्य वाटले. मानवी संभाषण ज्या प्रकारचे असते त्याचप्रकारे संभाषण त्यांच्यात होते. ही माकडेही मानवाप्रमाणे कुणाशीही बोलायला उत्सुक असतात.
संशोधकांच्या मते चिम्पांझी व इतर मोठय़ा माकडांप्रमाणे ही छोटी माकडे जास्त शहाणी असतात व ते दुसऱ्या माकडांनाही बोलण्याची संधी देत असतात किंवा मध्येच दुसऱ्यांचे संभाषण सुरू असताना त्यात नाक खुपसत नाहीत. गझनफर व डॅनियल ताकाहाशी यांच्या मते मॅरमोसेट माकडे विशिष्ट आवाज काढून प्राथमिक संवाद सुरू करतात. मॅरमोसेट माकडे जेव्हा गर्भाशयात असतात तेव्हा त्यांचा आईवडिलांशी संपर्क कसा असतो किंवा ते कसा संवाद साधतात यावरही संशोधन चालू आहे. त्यातून मानवी संभाषणातील काही त्रुटी दूर करण्यासही मदत होईल असे गझनफर यांचे म्हणणे आहे. सेल प्रेस बायॉलॉजी करंट बायॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
जर मॅरमोसेट माकडांना एखाद्या खोलीच्या विरुद्ध बाजूंना उभे केले व ते एकमेकांचा आवाज ऐकू शकत असतील तर ते एकमेकांशी एकाच वेळी बोलायला सुरुवात करीत नाहीत. ते एकाने प्रतिसाद दिल्यानंतर पाच सेकंद थांबून मगच बोलतात. संभाषणाचे शिष्टाचार ते पाळतात असा याचा अर्थ आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.