'आमच्या भूभागावर कारवाई झालीच नाही'

भारतीय लष्कराने म्यानमारच्या भूमीत दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईत २० दहशतवादी ठार मारले, यावर भारतासह शेजारील देशांमध्ये चर्चा असतांना, मात्र चोवीस तासातच म्यानमारने या वृत्ताचे खंडन केले. ही कारवाई आमच्या नव्हे तर भारतीय भूभागातच झाल्याचा दावा. म्यानमार अध्यक्षीय कार्यालयाच्या संचालकांनी केला आहे.

Updated: Jun 11, 2015, 05:09 PM IST
'आमच्या भूभागावर कारवाई झालीच नाही' title=

नैपाई तॉ : भारतीय लष्कराने म्यानमारच्या भूमीत दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईत २० दहशतवादी ठार मारले, यावर भारतासह शेजारील देशांमध्ये चर्चा असतांना, मात्र चोवीस तासातच म्यानमारने या वृत्ताचे खंडन केले. ही कारवाई आमच्या नव्हे तर भारतीय भूभागातच झाल्याचा दावा. म्यानमार अध्यक्षीय कार्यालयाच्या संचालकांनी केला आहे.

म्यानमार अध्यक्षीय कार्यालयाचे संचालक झाव हटय यांनी याबाबतचा गौप्यस्फोट आपल्या फेसबुक अकाऊंटवर केला आहे. त्यांनी यात म्यानमार लष्कराचा हवाला देत भारतीय लष्कराने आपल्या हद्दीत न येता भारत- म्यानमार सीमेवरच ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. 

अर्थात शेजारी राष्ट्रांविरोधातील कारवायांसाठी आम्ही आमचा भूभाग कोणत्याही बंडखोरांना कधीच वापरू देणार नाही, असेही म्यानमारने स्पष्ट करीत भारताच्या दहशतवादविरोधी लढय़ाला पाठिंबाच दिला आहे.

दरम्यान, भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये आणखी कारवाया करण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल पुढील रणनीती ठरविण्यासाठी म्यानमारला जाणार आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.