www.24taas.com झी मीडिया, लंडन
‘जैक द रिपर’ नावाचा एक खतरनाक खूनी जो फक्त वेश्यांचा धंदा करणाऱ्या, नशेमध्ये असणाऱ्याच मुलींना आपली शिकार बनवत असे. कोण होता हा खूनी? वेश्यांनाच का मारत होता? अशी खळबळ जनक घटनेचे पत्र जेव्हा वृत्तपत्रात आले तेव्हा ते दुसरे कोणी नाही तर स्वतः खून्यानेच दिले होते. या पत्रामुळे त्या हत्याऱ्याला एक नाव मिळाले आणि ते म्हणजे ‘जैक द रिपर’
‘जैक द रिपर’ने पाच मुलींना मारले होते. या पाचही जणींना एका वेगळ्या पद्धतीने मारले होते. या मुलींच्या मानेवर एका चाकूने वार केले होते. लंडनचा ‘व्हाइट चॅपल’ परिसर हा वेश्यांचं खास ठिकाण मानलं जात होतं. जैकने याच परिसरातील अनेक मुलींचा जीव घेतला. ३१ ऑगस्ट १८८८ मध्ये जैक याने आपले पहिले शिकार मेरी अॅन निकोलसला बनवले. मेरी निकोलसचे मृत शरीर सर्वप्रथम दोन कर्मचाऱ्यांनी पाहिले. प्रथम तिल्या बघितल्यावर ती मेली आहे हे लक्षात आले नाही पण बॅटरीच्या लाईटमुळे तिच्या गळ्यावर चाकूचा वार झाला आहे असे दिसले, अशी माहिती त्या कर्मचाऱ्यांनी दिली. या घटनेला एक आठवडा होत नाही तोच दुसरी वेश्या ऐनी चॅपमेनची हत्या झाली.
दोन्ही खून एकाच पद्धतीने केले होते. ‘द स्टार’ या वृत्तपत्रात ८ सप्टेंबर १८८८ ला ही धक्कादायक बातमी देण्यात आली आणि सर्वत्र भीतीचे सावट पडले. त्या खून्याला शोधण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न चालू झाले. पोलिसांनी माहितीसाठी जवळजवळ १०० वेश्यांकडे चौकशी केली. वेश्यांने अशा एका व्यक्तीची माहितीही दिली पण त्यांना त्याच्याविषयी नीट सांगता आले नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात तर घेतले पण सप्टेंबरच्या शेवटच्या तारखेला त्याने दोन मुलींचा खून केला. ही घटना रात्री १ वाजता घडली. ही घटना व्हिक्टोरिया राणीच्य़ा काळातील आहे.
वृत्तपत्रामध्ये बातमी आली. तो खूनी परत आला त्याने या वेळी दोन जणांना आपली शिकार बनवलंय. या घटनेमुळे फक्त लंडनच नाही तर पूर्ण जगात खळबळ उडाली. जगभरातून हजारो लोक घटनास्थळी गेले. एवढंच नाही तर व्हिक्टोरीया राणी स्वतः तिथे पोहोचली. तिने या घटनेवरून खूप प्रश्न उपस्थित केले. या परिसरात सर्वत्र पोलिसांनी गुप्तहेर यंत्रणा कामाला लावली. प्रत्येक ठिकाणी पोलिसांचे लक्ष होते. त्यामुळे त्या खुन्याने माघार घेतली खरी पण फक्त काही काळासाठीच...
एक महिना झाल्यानंतर त्याने पुन्हा कमी वयाच्या मुलीचा खून केला. मेरी केली असं हिचं नाव असून ती फक्त २५ वर्षाची होती. त्या खून्याने या मुलीला घरातच मारले होते. त्या मुलीच्या घरमालकाने सांगितले की, तिचा खून एका राक्षसाने केला आहे की काय असं तिच्या मृतदेहाकडे बघून वाटतं होतं.
या घटनेनंतर त्याने खून करणं बंद केले. पण आजही या घटनेमुळे व्हिक्टोरीया राणीच्या काळातील लंडनची आठवण मनात एक भीती निर्माण करते. या रिपरची ही घटना अजूनही एक रहस्यच आहे. त्याच्याविषयाचे सर्व पुरावे नष्ट करण्यात आले. एक प्रश्न अजूनही सर्वांच्या मनात जिवंत आहे आणि तो म्हणजे कोण होता तो खूनी? त्याने हे खून का केले?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.