पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमध्ये दाखल; 19 तोफांची सलामी

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यासाठी नेपाळमध्ये दाखल झालेत. यावेळी नेपाळच्या सेनेनं 19 तोफांची सलामी देत मोदींचं स्वागत केलंय

Updated: Aug 3, 2014, 03:07 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमध्ये दाखल; 19 तोफांची सलामी title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यासाठी नेपाळमध्ये दाखल झालेत. यावेळी नेपाळच्या सेनेनं 19 तोफांची सलामी देत मोदींचं स्वागत केलंय. 

मोदींच्या या दौऱ्यात उर्जेच्या क्षेत्रात करारांवर स्वाक्षऱ्या होतील. भारताकडून नेपाळला काही आर्थिक मदतही केली जाण्याची शक्यता आहे. नेपाळच्या संसदेसमोर मोदी भाषण करणार असून  प्रसिद्ध पशूपतीनाथ मंदिरात जाऊनही मोदी तेथे विशेष पूजा करणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी सर्वप्रथम भूतानला भेट दिली होती, त्यानंतर नेपाळ या दुसऱ्या सार्क देशाला मोदी भेट देणार आहेत.  

आपल्या ‘पुत्रा’सह पंतप्रधान मोदी नेपाळ दौऱ्यावर

मंत्र्यांच्या शिष्टमंडळासह मोदी दोन दिवस नेपाळचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे मोदी त्यांचा धर्मपूत्र जीत बहादूर यालाही सोबत घेऊन जाणार आहेत. ८० टक्के हिंदू असलेल्या नेपाळमधील संसदेसमोर मोदी भाषण करणार आहे. तसेच प्राचिन मंदीरालाही मोदी भेट देणार आहेत. यादरम्यान मोदी आपल्या धर्मपुत्राला - जीतला त्याच्या कुटुंबीयांची भेट घडवून देणार आहेत. जीतला त्यांच्या कुटुंबीयासोबत पाहण्यास मी उत्सुक असल्याच ट्विट मोदींनी केलंय. मोदींसोबत कुटुंबियांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचं जीत बहादूरनेही सांगितलंय. 


मोदींचा धर्मपूत्र जीत बहादूर 

कोण आहे हा जीत बहादूर? 
गरीबीमुळे कामाच्या शोधात लहान वयात जीत भारतात आला होता. मात्र, कुठेच काही काम मिळत नसल्यानं त्याने राजस्थाहून गोरखपूरसाठी रेल्वे पकडली. मात्र, जीत ज्या गाडीत बसला होता ती गाडी गुजरातला जाणारी होती. गुजरातला भटकत असताना एका महिलेची नजर जीतवर पडली. आcणि त्या महिलेनच जीतची भेट १९९८ मध्ये नरेंद्र मोदींशी करून दिली आणि जीतच भाग्यचं बदललं. जीतच्या शिक्षणापासून ते राहण्या-खाण्यापर्यंतचा सर्व खर्च मोदींनी करून त्याला घडवलंय. 

जीद बहादूरच्या सहा बोटांची ओळख...  
जीत बाहदूर याची त्याच्या कुटुंबीयासोबत भेट घडवून देण्यास मोदी उत्सुक आहेत. त्यामुळे मोदींनी जीत बहादूरविषयी अनेक ट्विट केलेत. काही वर्षापूर्वी जीत बाहदूर याच्या कुटुंबीयांना शोधण्यात आम्ही यशस्वी झालो ते त्याच्या तळपायाला असलेल्या सहा बोटांमुळे... असं ट्टिवटही मोदींनी केलंय. तसेच ईश्वरच्या प्रार्थनेमुळेच १२ वर्षापूर्वी असाहय असलेल्या मुलाला आपण वाढवल्याचं मोदींनी सांगितलंय. त्यामुळेच नेपाळ सरकारसोबत जीत बहादूरच्या कुटुंबीयांनीही मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी केलीयं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.