पॅरीस: मंगळ ग्रहावर भविष्यात मानवी वस्ती असण्याची कल्पना आता केवळ कथांमध्येच राहणार नाही. कारण मंगळावर पाणी असल्याचा शोध लागलाय. अमेरिकी अंतरिक्ष एजंसी नासानं सोमवारी ही माहिती दिली.
नासाच्या खगोलीय विज्ञान विभागाचे संचालक जिम ग्रीन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, 'मंगळ हा कोरडा आणि उजाड ग्रह नाहीय, जसा पहिले विचार केला जायचा. काही ठिकाणी मंगळावर पाणी आढळलं आहे.' संशोधकांना पूर्वीपासूनच हा विश्वास होता मंगळवार भरपूर प्रमाणात पाणी आहे.
Water! Strong evidence that liquid water flows on present-day Mars. Details: http://t.co/0MW11SANwL #MarsAnnouncement pic.twitter.com/JNksawz2iN
— NASA (@NASA) September 28, 2015
ग्रीन यांनी सांगितलं की, ती अब्ज वर्षांपूर्वी वातावरणात मोठा बदल झाल्यानं मंगळाचं रूपच पालटलं. ते म्हणाले, 'आज या ग्रहाबद्दल आम्ही सांगू शकतोय. आमच्या रोवर्सनं शोध लावलाय की तिथं हवेत अधिक आर्द्रता आहे.' तसंच ग्रहावरील माती अपेक्षेपेक्षा खूप नरम आहे.
उतारावर गडद रेषा
मंगळावर चार वर्षांपूर्वी उतारावर गडद रेषा पाहिल्या गेल्या होत्या. संशोधकांजवळ याचे पुरावे नव्हते. मात्र नंतर लक्षात आलं या रेषा गर्मीमध्ये वाढतात आणि हिवाळ्यात गायब होतात. आता कळलंय की या रेषा म्हणजे पाण्याचा प्रवाह आहे. मात्र आता यावर अधिक अभ्यास करून अधिक सांगण्यात येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.