मंगळावर पाठवा तुमचं नाव...

मंगळावर आणि आपलं नाव? तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे?? पण... खरोखरच हे शक्य आहे... नासानं ही संधी उपलब्ध करून दिलीय. 

Updated: Oct 9, 2014, 05:02 PM IST
मंगळावर पाठवा तुमचं नाव...  title=

न्यूयॉर्क : मंगळावर आणि आपलं नाव? तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे?? पण... खरोखरच हे शक्य आहे... नासानं ही संधी उपलब्ध करून दिलीय. 

ओरियन अंतराळ यानाच्या मदतीनं अमेरिकेच्या ‘नॅशनल अॅरोनॉटिक्स अॅन्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन’नं (नासा) तुम्हाला तुमचं नाव मंगळ ग्रहापर्यंत पोहचवण्याची संधी दिलीय. येत्या 4 डिसेंबर रोजी या ओरियन यान उड्डान घेणार आहे. 

या मोहिमेसाठी याअगोदरच जवळपास 95 हजार लोकांनी आपल्या नावाची नोंद केलीय. तुम्हालाही आपल्या नावाची नोंद मंगळ ग्रहावर करायची असेल तर तुम्हाला ‘नासा’च्या (ओरियन मार्स व्हिजिट) वेबसाईटवर साईन इन करावं लागेल आणि काही सूचना भराव्या लागतील. यानंतर वेबसाईटकडून तुम्हाला तुमच्या नावाचा डिजिटल बोर्डिंग पास मिळेल. 

यानंतर तुम्हाला ‘यशस्वी’ असा एक मॅसेजही मिळेल... तुमचं नाव ओरियन उड्डान परिक्षणाद्वारे मंगळापर्यंत पोहचवला जाईल. नोंद झालेल्या सगळी नावं एका मायक्रोचिपवर असतील. ओरियन उड्डाण परिक्षणमध्ये तुम्हाला तुमच्या नावाची नोंद 31 ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे. 

एका रिपोर्टनुसार, विविध शोध आणि भविष्यात लोकांना मंगळापर्यंत पोहचवण्यासाठी नासा खूप मेहनत घेत आहे. या नावांना मंगळावर पाठवून आम्हाला भविष्यात लोकांना मंगळ यात्रेचा एक भाग बनवणंही शक्य होईल, असं ओरियम प्रोग्राम मॅनेजर मार्क गेयर यांनी म्हटलंय.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.