काठमांडू : नेपाळमध्ये गेल्या शनिवारी आलेल्या ७.९ तीव्रतेच्या भूकंपामुळे धरहरा मनोरा आणि दरबार चौक सारख्या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या इमारती जमीनदोस्त झाल्या पण पाचव्या शतकातील सुप्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराला कोणतेही नुकसान झाले नाही.
मंदिरातील एका भक्तांनी सांगितले की, 'पशुपतिनाथ मंदिर सुरक्षित आहे. हमने मंदिराचे अनेकवेळा निरिक्षण केले त्याला कोणत्याही भेगा पडल्या नाहीत. हे मंदिर काठमांडू खोऱ्यातील युनिस्कोच्या सात वर्ल्ड हेरिटेज पैकी आहे. काठमांडूतील हे सर्वात प्राचीन मंदिर आहे.
गेल्या शनिवारी आलेल्या भूकंपात आपल्या परिवाराला गमाविलेल्या एका नागरिकाने सांगितले की, आम्ही ऑफिसला जात नाही, आम्ही मंदिरात राहत आहोत. या भयावह समयी सर्वात सुरक्षित स्थान आहे. नागरिकांनी पशुपतीनाथ मंदिराच्या परिसरात भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करीत आहेत.
मंदिराच्या परिसरात सुमारे १०० जणांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. आतापर्यंत ३७२५ जणांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.