www.24taas.com, झी मीडिया,इस्लमाबाद
‘दहशतवाद पुरस्कृत देश’ म्हणून घोषित करण्याचा अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिल्यानंतरही पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मे 1992मध्ये ‘आयएसआय` या पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याला काश्मीरमधील आपल्या छुप्या कारवाया सुरूच ठेवण्यास सांगितलं होतं.
पाकिस्तानचे माजी राजदूत हक्कानी यांनी लिहिलेल्या नव्या पुस्तकात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकात म्हटले आहे, की अमेरिकेने कडक इशारा देऊनही शऱीफ यांनी दहशतवादी कारवाया सुरू ठवण्याचाच आग्रह धरला होता. पाकिस्तान भारताविरुद्ध लष्करी कारवाई बंद करू शकत नाही, असं आयएसआय आणि लष्कराने म्हटलं होतं. अमेरिकेकडून मिळालेला कठोर इशारा मागे घ्यायला लावण्याच्या दृष्टीने शरीफ यांनी अमेरिकन मीडिया तसेच कॉंग्रेसशी संपर्क साधण्यासाठी प्राथमिक तयारी म्हणून 20 लाख डॉलरची तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता.
प्रत्यक्षात शरीफ यांनी आपले तत्कालीन विशेष सहायक हुसैन हक्कानी यांच्यावर अमेरिकेतील लॉबिंगची जबाबदारी सोपविली होती. मात्र हक्कानी यांनी त्याला नकार देऊन राजदूत म्हणून श्रीलंकेत जाणे पसंत केले, असेही पुस्तकात म्हटले आहे.
अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हक्कानी यांनीच लिहिलेले "मॅग्नीफिशंट डिल्युशन` या पुस्तकात हा खुलासा करण्यात आला असून, हे पुस्तक पुढील आठवड्यात बाजारात येत आहे. पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग जम्मू - भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान ध्वज बैठक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचा भंग करीत नियंत्रण रेषेवरील अखनूर तहसीलमधील हामीरपूर आणि गिग्रियाल भागातील भारतीय चौक्यांनवर गोळीबार केला.
काल रात्री सुमारे साडेसहा तास गोळीबार सुरू होता, अशी माहिती अधिकृत प्रवक्त्या ने दिली. यामध्ये कोणत्याही हानीचे वृत्त नसल्याचेही या प्रवक्त्याने स्पष्ट केले. पाकिस्तानने या वर्षी सुमारे १५० वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.