भविष्यात येतंय पारदर्शक विमान!

Updated: Oct 28, 2014, 08:14 PM IST
भविष्यात येतंय पारदर्शक विमान! title=

तुम्ही जर विमानातून प्रवास करताना विमानाच्या खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहून आनंदी होत असाल. पण, भविष्यात विमानाला अशी खिडकी नसेल. विमानात खिडक्या नसणार तरीही आपण बाहेरच्या जगाशी जोडले जाणार असून विमान आणखी अत्याधुनिक सोयी-सुविधानी परिपूर्ण असणार आहेत.

युकेची एक कंपनी विमान क्षेत्रात एक क्रांतीकारक बदल घडविणार आहे. ही कंपनी बनविणार असलेल्या विमानामध्ये खिडकी नसेल तरीही प्रवासी बाहेरचे दृश्य पाहू शकतात. कारण विमानाच्या बाहेरच्या भिंतीवर अल्ट्रा थीन आणि हाई-फ्लेक्सिबल स्क्रीन लावण्यात येणार आहे. प्रवासी या स्क्रीनमधून बाहेरचे दृश्य पाहणार येणार आहे. जेव्हा हवे त्या वेळी टच स्क्रीनवर आपण ३५ हजार फूट उंचीवरून सुद्धा ई-मेल चेक करू शकतो.

खिडकी नसताना सुद्धा विमानातून बाहेरचे सुदंर दृश्य पाहण्यासाठी विमानाबाहेर कॅमेरे लावले जाणार आहे. त्यामुळं जवळपासचे दृश्य पाहण्यासाठी विमानामध्ये टच स्क्रीन रियल टाइमच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे. सेंटर फॉर प्रोसेस इनोवेसन (सीपीआय) ही संपूर्ण भविष्यातील कल्पना आहे. ही सर्व डिझायन अजून सत्यात अवतरण्यासाठी त्याला १० वर्ष लागणार आहे. पण, विंडोलेस कमर्शियल एयरक्राफ्ट यांच्या द्वारे जगातील पहिले विमान बनविण्याच्या तयारीत आहे.

या विमानात विंडो सीटवर बसलेला व्यक्ती ठरवू शकतो की, बाहेरच्या भिंतीवर कोणते दृश्य मनोरंजनासाठी देखील पाहू शकतो. मधल्या सीटचा प्रवासी समोरील सीटवर स्क्रीनवर जो विंडो सीटवर बसलेला व्यक्ती करू शकतो. तसेच विंडो सीटचा व्यक्ती बाहेरील भिंतीवर देखील करू शकतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.