भारतीय वंशाचा ९ वर्षीय अनिरूद्ध बनला 'स्पेलिंग बी चॅम्पियन'

भारतीय वंशाचा नऊ वर्षीय अनिरुद्ध काथिरवेल याने ५० हजार डॉलरची ‘द ग्रेट ऑस्ट्रेलियन स्पेलिंग बी’ स्पर्धा जिंकून ऑस्ट्रेलियाचा नवा स्पेलिंग चॅम्पियन बनला आहे. 

Updated: Sep 10, 2015, 05:41 PM IST
भारतीय वंशाचा ९ वर्षीय अनिरूद्ध बनला 'स्पेलिंग बी चॅम्पियन' title=
courtosy Pictures: Ian Currie

मेलबर्न : भारतीय वंशाचा नऊ वर्षीय अनिरुद्ध काथिरवेल याने ५० हजार डॉलरची ‘द ग्रेट ऑस्ट्रेलियन स्पेलिंग बी’ स्पर्धा जिंकून ऑस्ट्रेलियाचा नवा स्पेलिंग चॅम्पियन बनला आहे. 

तमिळ परिवारात मेलबर्नमध्ये जन्मलेला काथिरवेल याला काल ५० हजार डॉलरच्या शैक्षणिक खर्चाचे पारितोषिक देण्यात आले. तसेच त्याच्या शाळेला १० हजार डॉलर किंमतीच्या शैक्षणिक वस्तू देण्यात येणार आहे. छोट्या काथिरवेलला स्पर्धा जिंकल्याचा विश्वास बसत नव्हता. त्याने मित्रांना चिमटी काढायला सांगितली. 

त्यान म्हटले की, मी खरचं जिंकलो आहे यासाठी मी माझे डोळे चोळले. मी जागा आहे की स्वप्न पाहत आहे. त्यानंतर मला जाणीव झाली की स्वप्न पाहत नाही. पृथ्वीराज आणि आई सुजाता १६ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात राहण्यासाठी आले आहे. 

दुसऱ्या वर्षापासून अनिरुद्धने अभ्यास करायला सुरूवात केली होती. हळूहळू वाचण्याची आवड प्रेमात बदलली. माझ्या आई-वडीलांनी मला स्पेलिंगच्या जगात पुढे जाण्यात मदत केली. पहिल्या ग्रेडमध्ये शिकताना स्पेलिंग स्पर्धेत भाग घेतला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.