क्वीन एलिझाबेथनं तोडला आपल्या आज्जीचा रेकॉर्ड! रचला नवीन इतिहास...

ब्रिटनची महाराणी क्वीन एलिझाबेथ यांनी बुधवारी एक नवीन रेकॉर्ड केलाय. आता, ब्रिटनच्या इतिहासात सर्वांत अधिक काळ शाही तख्तावर विराजमान राहिलेली महाराणी म्हणून एलिझाबेथ द्वितीय ओळखल्या जाणार आहेत.

Updated: Sep 10, 2015, 11:44 AM IST
क्वीन एलिझाबेथनं तोडला आपल्या आज्जीचा रेकॉर्ड! रचला नवीन इतिहास... title=

एडेनबर्ग : ब्रिटनची महाराणी क्वीन एलिझाबेथ यांनी बुधवारी एक नवीन रेकॉर्ड केलाय. आता, ब्रिटनच्या इतिहासात सर्वांत अधिक काळ शाही तख्तावर विराजमान राहिलेली महाराणी म्हणून एलिझाबेथ द्वितीय ओळखल्या जाणार आहेत.

एलिझाबेथ यांनी आपली आजी म्हणजेच महाराणी व्हिक्टोरिया यांचा सर्वात अधिक काळापर्यंत शासन करण्याचा रेकॉर्ड तोडलाय. महाराणी व्हिक्टोरिया ६३ वर्ष, सात महिने, दोन दिवस, १६ तास आणि २३ मिनिटे या पदावर विराजमान होत्या. बुधवारी सकाळी भारतीय वेळेनुसार दहा वाजल्याच्या सुमारास एलिझाबेथ यांनी हा रेकॉर्ड तोडलाय.

उल्लेखनीय म्हणजे, वयाच्या केवळ २५ वर्षी महाराणी पदाचा मुकूट एलिझाबेथ द्वितीय यांच्या डोक्यावर चढवण्यात आला होता. 

अगोदर एलिझाबेथ यांना हा आपला रेकॉर्ड सार्वजनिकरित्या साजरा करण्याची इच्छा नव्हती. पण, जनतेच्या इच्छेच्या दबावामुळे त्यांचा हा रेकॉर्ड स्कॉटलंडमध्ये अधिकृतरित्या साजार होणार आहे. या ठिकाणी एलिझाबेथ उन्हाळ्यामध्ये सुट्ट्यांसाठी दाखल होतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.