बीबीसी डॉक्युमेंटरी : मी कोणतेही उल्लंघन केलेले नाही - उडविन

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कारावर डॉक्युमेंटरी करुन ती प्रसारित केल्याने वादग्रस्त ठरलेल्या लेस्ली उडविन यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मी कोणत्याही कराराचे उल्लंघन केलेले नाही, असे तिने म्हटलेय.

Reuters | Updated: Mar 6, 2015, 11:24 PM IST
बीबीसी डॉक्युमेंटरी : मी कोणतेही उल्लंघन केलेले नाही - उडविन title=

लंडन : दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कारावर डॉक्युमेंटरी करुन ती प्रसारित केल्याने वादग्रस्त ठरलेल्या लेस्ली उडविन यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मी कोणत्याही कराराचे उल्लंघन केलेले नाही, असे तिने म्हटलेय.

बीबीसीने १५ डिसेंबर २०१२ रोजीच्या सामूहिक बलात्कारावर आधारित एक वादग्रस्त डॉक्युमेंट्री तयार केली. त्याचे प्रसारण करण्याची योजना होती. मात्र, भारत सरकारने त्यावर बंदी घातल्यानंतर ही डॉक्युमेंट्री लंडनमध्ये प्रसारित केली. तसेच यूट्युबवर व्हिडिओ अपलोड केला. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला.

सामूहिक बलात्कारावर आधारित 'इंडियाज डॉटर' या डॉक्‍युमेंट्रीच्या निर्मात्या लेस्ली उडविन या आहेत. 
डॉक्‍युमेंट्री प्रसारित करून लेस्ली यांनी कराराच उल्लंघन केल्याचा दावा तिहार जेल प्रशासनानं केलाय. मात्र या आरोपाचे लेस्ली यांनी खंडन केले आहे. तसेच अशा जागतिक प्रसारणासाठी कोणताही कायदा नसल्याने त्यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे यांनी स्पष्ट केले.
 
यासंबधी कारवाई करण्याचे आश्वासन गृहमंत्रालयाने दिले आहे. परंतु अशी कारवाई  म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्राला धक्का असल्याची प्रतिक्रिया उडविन यांनी व्यक्त केली आहे.

डॉक्‍युमेंट्रीचे प्रसारण भारतात करणार नसल्याचे बीबीसीने स्पष्ट केले आहे. मात्र बंदी झुगारून इंग्लंडमध्ये बुधवारी या डॉक्‍युमेंट्रीचे प्रसारण प्रसारण करण्यात आले. 

दरम्यान, तिहार जेलच्या आत शुटींग आणि मुलाखत करण्यची परवानगी कोणी दिली याची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.