अंबानींना पछाडत दिलीप सांघवी बनले सर्वात श्रीमंत भारतीय!

फार्मा क्षेत्रातील दिग्गज दिलीप सांघवी यांनी संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानी यांना केवळ दोनच दिवसांत पछाडलंय. फोर्ब्सच्या रिअल टाईम अपडेटनुसार, सन फार्मा समूहाचे सांघवी हे आता भारतातील सर्वांत श्रीमंत भारतीय ठरलेत.

Updated: Mar 5, 2015, 07:16 PM IST
अंबानींना पछाडत दिलीप सांघवी बनले सर्वात श्रीमंत भारतीय!

न्यूयॉर्क : फार्मा क्षेत्रातील दिग्गज दिलीप सांघवी यांनी संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानी यांना केवळ दोनच दिवसांत पछाडलंय. फोर्ब्सच्या रिअल टाईम अपडेटनुसार, सन फार्मा समूहाचे सांघवी हे आता भारतातील सर्वांत श्रीमंत भारतीय ठरलेत.

महत्त्वाचं म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांना सलग आठव्या वर्षी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केलं होतं.

सन फार्मा समूहाचे सांघवी 21.5 अरब डॉलर्सच्या नेटवर्थसोबत सर्वांत श्रीमंत भारतीय ठरलेत. दुसऱ्या स्थानावर मुकेश अंबानी तर तिसऱ्या स्थानावर अजीम प्रेमजी आहेत. 

आंतरराष्ट्रीय धनाढ्य व्यक्तींच्या यादीत सांघवी आज 37 व्या स्थानावर दाखल झालेत. सांघवी समूहाच्या कंपनीच्या शेअर्सची किंमत वधारल्यानं सांघवी यांचं नेटवर्थ 21.5 अरब डॉलरवर दाखल झालंय. तर अंबानी यांचं नेटवर्थ 20.4 अरब डॉलर आहे.  

यापूर्वी, सोमवारी फोर्ब्सनं जाहीर केलेल्या यादीत अंबानी 39 व्या स्थानावर होते तर सांघवी 44 व्या स्थानावर... तर प्रेमजी 48 व्या स्थानावर होते. यापूर्वी, वार्षिक धनाढ्य लोकांच्या यादीत अंबानी यांची संपत्ती 21 अरब डॉलर होती जी 13 फेब्रुवारीच्या शेअर मूल्य आणि विनिमय दरांवर आधारित होती. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.