www.24taas.com, ऑस्लो
शांततेचा नोबेल पुरस्कार युरोपीय संघाला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार २०१२ साठी आहे. १.२ मिलीयन अमेरिकन डॉलर्स एवढी पुरस्कार रक्कम असलेला हा पुरस्कार ऑस्लोमध्ये १० डिसेंबरला प्रदान करण्यात येईल.
नॉर्वेच्या नोबेल पुरस्कार समितीने कर्जाच आर्थिक संकट असतानाही महाद्विपातील देशांना एकजूट ठेवल्याबद्दल युरोपियन युनियनला या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे.
युरोपियन संघाने फ्रांस आणि जर्मनीला जवळ आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. याचबरोबर दक्षिण, मध्य आणि पूर्व युरोपमधील लोकतंत्र मजबूत करण्यात ही मोठे योगदान आहे.
नॉर्वेजियन नोबेल कमिटीच्या टॉप सिक्रेट लिस्टमध्ये २३१ व्यक्ती आणि संघटनांचा समावेश आहे. या आधीही नोबेल पुरस्कारावरून वाद निर्माण झाले आहेत.