वॉशिंग्टन : दहशतवाद हा कॅन्सरसारखा असून त्याला संपवण्याशिवाय पर्याय नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांनी म्हटलंय. कॅलिफोर्नियातील गोळीबार ही दहशतवादी घटना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ओबामांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात हे मुद्दे मांडले.
२०११ नंतर पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात युद्ध पुकारण्याची वेळ आली असून आत्मसंरक्षणासाठी त्याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी म्हटलंय. इसिसचा इस्लामशी काहीही संबंध नसून जगभरातील मुस्लिम नेत्यांनी जनतेला इस्लाम म्हणजे काय, हे समजून द्यावं, असा सल्लाही त्यांनी दिलाय.
तसेच हा दहशतवाद संपवण्यासाठी कटिबद्ध आहोत. ही लढाई मुस्लिमविरोधी नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. २०१० नंतर ओबामांनी प्रथमच वॉशिंग्टनच्या ओव्हल ऑफिसमधून राष्ट्राला उद्देशून भाषण केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.