नावेद पाक नागरिक असल्याचा भारताचा दावा खोटा - पाकिस्तान

भारतीय सुरक्षादलांना बुधवारी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश मिळालंय. अजमल कसाबनंतर जिवंत सापडलेला उस्मान उर्फ नावेद खान याला जिवंत पकडलंय. 

Updated: Aug 6, 2015, 04:34 PM IST
नावेद पाक नागरिक असल्याचा भारताचा दावा खोटा - पाकिस्तान title=

नवी दिल्ली : भारतीय सुरक्षादलांना बुधवारी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश मिळालंय. अजमल कसाबनंतर जिवंत सापडलेला उस्मान उर्फ नावेद खान याला जिवंत पकडलंय. 

सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार नावेदनं सुरक्षा एजन्सीसमोर आपले गुन्हे कबूल करत अनेक नवे खुलासे केलेत. नावेद हा पाकिस्तानचा नागरिक असून तो फैसलाबाद जिल्ह्याचा रहिवासी आहे. 

परंतु, पाकिस्ताननं मात्र नेहमीप्रमाणेच यावेळेसही आपले डोळे बंद करून घेतलेत. पाकिस्तान सरकारनं नावेदला आपला नागरिक मानण्यास नकार दिलाय. पाकिस्तानी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याला पाकिस्तानी असल्याचा भारताचा दावा खोटा आहे... हे चुकीचं असून भारत पाकशी सूडभावनेतून हे करत आहे. 

भारतीय सुरक्षा दलाच्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान नावेदनं आत्तापर्यंत अनेकदा आपला जबाब बदललाय. नावेदनं आपलं मिशन आणि दहशतवाद पसरवण्याचा संपूर्ण प्लान एजन्सीसमोर उघड केलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.