फेसबुकचा वापर दहशतवादासाठी, दहशतवाद्यांची भरती सुरू

पालघरमधील मुलींचं प्रकरण असो अथवा मुंबईतील सीएसटी येथील दंगल असो यात प्रामुख्याने फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता.

Updated: Dec 13, 2012, 01:04 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद
फेसबुकमुळे काय काय होऊ शकतं याचा आपण सगळ्यांनी चांगलाच अनुभव घेतला आहे. पालघरमधील मुलींचं प्रकरण असो अथवा मुंबईतील सीएसटी येथील दंगल असो यात प्रामुख्याने फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. आणि आता पुन्हा एकदा अपप्रवृ्त्तींना प्रोत्साहन देण्यासाठी फेसबुकचा वापर करण्यात येत आहे.
पाकिस्तानच्या तालिबानी संघटनेने नव्या दहशतवादी भरतीसाठी फेसबुकचा वापर सुरू केला आहे. तहरीक-ए-तालिबान या संघटनेने दहशतवादाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आता फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या ‘तहरीक-ए-तालिबान’च्या खास पेजला आतापर्यंत २९० समर्थक लाभले आहेत.

तालिबानच्या पेजवरील ‘अयाह-ए-खिलाफत’मध्ये असे आवाहन करण्यात आले आहे, ‘प्यारे भाईयों एवं बहनों कलम तलवार से अधिक ताकतवार है। आपके पास इस शक्तिशाली हथियार के प्रयोग कर एक मोका है। आप लोग अपनी पसंद के लेख लिख के तालिबानी तत्त्वों का प्रचार कर सकते ’
‘तालिबान’ने आपल्या पहिल्या संदेशात संपर्कासाठीचा ईमेल आयडीही दिला आहे. याशिवाय या पेजवर तालिबानला फटकारणारी पाकिस्तानी बालिका मलाला युसूफझाईवरील हल्ल्याचीही जबाबदारी स्वीकारली आहे.