पाकिस्तानी दाम्पत्याने अमेरिकेत केला होता गोळीबार

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरातील अपंगाच्या संस्थेवर झालेल्या गोळीबारातील हल्लेखोरांची ओळख पटली आहे. हल्ला करणाऱ्या तीन हल्लेखोरांपैकी दोघे जण हे पाकिस्तानी वंशाचे दाम्पत्य होते. ज्यांनी कॅलिफोर्नियाच्या सॅन बर्नांडिनोमधील एका संस्थेवर केलेल्या गोळीबारात तब्बल १४ जणांचा मृत्यू झाला. तर १७ अन्य जखमी झाले. २०१२ नंतर अमेरिकेतील हा घातक गोळीबार होता. 

Updated: Dec 4, 2015, 09:03 AM IST
पाकिस्तानी दाम्पत्याने अमेरिकेत केला होता गोळीबार title=

सॅन फ्रान्सिस्को : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरातील अपंगाच्या संस्थेवर झालेल्या गोळीबारातील हल्लेखोरांची ओळख पटली आहे. हल्ला करणाऱ्या तीन हल्लेखोरांपैकी दोघे जण हे पाकिस्तानी वंशाचे दाम्पत्य होते. ज्यांनी कॅलिफोर्नियाच्या सॅन बर्नांडिनोमधील एका संस्थेवर केलेल्या गोळीबारात तब्बल १४ जणांचा मृत्यू झाला. तर १७ अन्य जखमी झाले. २०१२ नंतर अमेरिकेतील हा घातक गोळीबार होता. 

अपंगाच्या संस्थेत कार्यक्रम सुरु असताना हल्ला केला. हल्ला केल्यानंतर हे हल्लेखोर दाम्पत्य एसयूव्ही कारच्या सहाय्याने फरार झाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. त्यानंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत या दोघांना कंठस्नान घालण्यात यश आले. यातील एक हल्लेखोर महिला असून तशफीन मलि असे तिचे नाव आहे. तर दुसऱा हल्लेखोर २८ वर्षीय रिजवान फारुक आहे. हे दोघेही मूळचे पाकिस्तानचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोघांचे लग्न झाले असून त्यांना सहा महिन्यांची मुलगीही होता. 

या हल्ल्याचा तपास एफबीआय करत आहे. दरम्यान हा हल्ला दहशतवादी घटना असल्याची शक्यता असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.