लंडन : जगाच्या इतिहासामध्ये प्रथमच एखाद्या शास्त्रज्ञाने स्वत:चे नाव 'ट्रेडमार्क' म्हणून नोंदविण्यास पुढाकार घेतला आहे. थोर शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी स्वत:चे नाव 'ट्रेडमार्क' म्हणून नोंद करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
हा अर्ज मंजूर झाल्यानंतर कोणत्याही उद्योग समूहास किंवा कंपनीस हॉकिंग यांच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव वापरता येणार नाही.
अर्थात, नावाचा 'ट्रेडमार्क' घेतला असला तरीही सामाजिक कार्यासाठी किंवा भौतिकशास्त्राठी एखादा ट्रस्ट सुरू करण्यास किंवा हॉकिंग यांना झालेल्या 'मोटर न्यूरॉन' या गंभीर आणि दुर्मिळ आजाराविषयी संशोधन करणाऱ्यांसाठी हॉकिंग यांचे नाव वापरण्याची मुभा असेल, असे 'संडे टाईम्स'मधील वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, संगणकावरील 'गेम्स', आरोग्यविषयक उत्पादने आणि आरोग्य क्षेत्रातील कोणत्याही कल्पनाविष्कारासाठी हॉकिंग यांचे नाव वापरण्यासाठी परवानगी आवश्यक असेल.
जगाच्या इतिहासामध्ये प्रथमच एखाद्या शास्त्रज्ञाने स्वत:चे नाव 'ट्रेडमार्क' म्हणून नोंदविण्यास पुढाकार घेतला आहे. या निर्णयामुळे एखाद्या अनावश्यक किंवा चुकीच्या उत्पादनाशी हॉकिंग यांचे नाव जोडले जाण्याची शक्यता कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यापूर्वी 'हॅरी पॉटर'च्या लेखिका जे. के. रोलिंग आणि इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅम यांनीही स्वत:च्या नावाचा 'ट्रेडमार्क' नोंदविला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.