तिची 'गूड न्यूज' पायलटने विमानात ऐकवली

विमानात अशा प्रकारची घटना ही पहिल्यांदाच घडली असावी.

Updated: Mar 3, 2016, 11:52 AM IST
तिची 'गूड न्यूज' पायलटने विमानात ऐकवली title=

लास वेगास : विमानात अशा प्रकारची घटना ही पहिल्यांदाच घडली असावी. कारण एका महिलेने आई होणार असल्याची खुशखबर, तिच्या नवऱ्याला चक्क विमानात प्रवास करताना सर्वांसमोर पायलटद्वारे उद्दघोषणा करुन दिली.

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

लास वेगास ते फिलाडेल्फिया दरम्यान विमानातून प्रवास करताना, लिसा सॅडिवँक या महिलेने ती गरोदर असल्याचे आपल्या नवऱ्याला सांगितले.

विशेष म्हणजे ही गूड न्यूज तिने विमानात पायलट उद्घोषणा देत असतो, त्याच्याजवळ एका चिठ्ठीत लिहून दिली, आणि त्याला सांगायला लावले. 

पायलटने जाहीरपणे ही गूड न्यूज तिच्या नवऱ्याला सांगितली. दरम्यान, ही उद्घोषणा होत असताना अनेक प्रवाशांनी त्या दोघांचे अभिनंदन केले. 

लिसाने गेल्या आठवड्यात घडलेल्या या प्रसंगाचा व्हिडीओ तिच्या फेसबुक पेजवर अपलोड केला असून तो ३० हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. 

 

Here's a MUST WATCH! A few weeks ago, my husband Eric Sadiwnyk got quite the surprise on our returning flight from Las Vegas. There aren't enough Thank You's for the crew of American Airlines Flight 607 (1/13/16) with service from Las Vegas to Philadelphia. You all helped me to pull this off seamlessly! I'm hoping if this video makes it around the internet a bit, I may be able to find the crew and Thank them again! I'll also be sending a copy to American Airlines Customer Relations. I love you Eric Sadiwnyk!

Posted by Lisa Sadiwnyk on Friday, February 26, 2016