ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश

गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्‍ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.

Updated: Oct 16, 2016, 08:29 PM IST
ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश title=

गोवा : गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्‍ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.

पीएम मोदींनी चीनच्या सहभागासह हे घोषणा पत्रामध्ये हे देखील लिहून घेतलं की, जो देश दहशतवादाला थारा देतो त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे. पाकिस्तानवर निशाना साधत गोवा घोषणा पत्रामध्ये सर्व सदस्य देशांनी त्यांच्या जमिनीवर दहशतवादी कारवायांना थारा न देण्याचं देखील संकल्प केला आहे.

पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, दहशतवाद संपवण्यासाठी ब्रिक्स देशांना एकत्र येवून काम करण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाला सर्व देशांनी सहमती दर्शवत दहशतवादाला थारा देणाऱ्या हिंसक शक्ती या सर्वांसाठी धोकादायक असल्याचं मान्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, दहशतवादाच्या मुद्द्यावर आपलं एकमत आहे. दहशतवाद, उग्रवाद हा सगळ्यांसाठी धोका आहे. शांती आणि संरक्षणाच्या मुद्द्यावर ब्रिक्स देशांनी एकमेकांना सहयोग करण्याचं जाहीर केलं.