गोवा : पाकिस्तानला पुन्हा एकदा लक्ष्य करत आणखी एका देशाने सुनावलं आहे. अमेरिकेनंतर रशियाने भविष्यात कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यास नकार दिला आहे.
रूसने हे देखील म्हटलं की, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सैन्यासोबत रशियाच्या सैनाने केलेला सराव हा भारतविरोधी नव्हता. तर पाकिस्तानातील दहशतवादाशी निपटण्यासाठी होता.
पाकिस्तानची झोप उडवणारी घोषणा रशियाचे डिफेंस कंपनी रोस्टेक स्टेट कॉरपोरेशनचे सीईओ सर्गेई चेमेझोव यांनी केली. चेनेझोव यांच्यानुसार पाकिस्तानला कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यासंबंधित कोणताही करार पाकिस्तान आणि रशियामध्ये नाही झाला. चेमेझोव यांनी म्हटलं की, पाकिस्तानला ट्रांसर्टेशनवाले हेलीकॉप्टर विकले गेले पण ती पूर्ण झाली आहे.
चेमेझोव यांच्या मते, पाकिस्तानला लढाऊ विमान आणि इतर कोणतेही युद्ध सामग्री रशिया विकणार नाही. रशिया आणि पाकिस्तानमध्ये झालेला सैन्य अभ्यासबाबत त्यांनी म्हटलं की, तो फक्त दहशतवादाशी लढण्यासाठई केलेला सराव होता. पाकिस्तानने दहशतवादाशी लढणे शिकलं पाहिजे. भारतासोबत रशियाचे संबंध हे चांगले आहेत आणि नेहमी चांगले राहतील. भारताविरोधी कोणताही प्रयत्न रशियाने केला नाही.