दहशतवाद जगाची मुख्य समस्या, समझोता नको - मोदी

दहशतवाद ही जगातल्या सर्व राष्ट्राला भेडसवणारी मुख्य समस्या असून याबाबत कोणताही समझोता करण्यात येऊ नये असं ठाम मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय.

PTI | Updated: Jul 16, 2014, 08:47 AM IST
दहशतवाद जगाची मुख्य समस्या,  समझोता नको - मोदी title=

ब्राझील : दहशतवाद ही जगातल्या सर्व राष्ट्राला भेडसवणारी मुख्य समस्या असून याबाबत कोणताही समझोता करण्यात येऊ नये असं ठाम मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय.
 
ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेमध्ये पंतप्रधानांचे काल रात्री भाषण झाले. यावेळी त्यांनी दहशतवादाबरोबर वेगवेगळ्या मुद्यांवर भारताची भूमिका सदस्य राष्ट्रांसमोर मांडली. 

विज्ञान आणि तंत्रज्ञानात ब्रिक्स देशांनी परस्पर सहकार्य करणं आवश्यक असून ब्रिक्स विद्यापीठ स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

युवकांचा विकासाताला वाटा वाढवणं आवश्यक आहे, असं सांगत असतानाच 'वसुधैव कुटुंबकम' हा भारतीय संस्कृतीचा अस्सल मंत्रही त्यांनी आपल्या भाषणात उच्चारला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.