पाकिस्तानातून आलेल्या महिलेची पोलखोल

जालंधरमधून विना व्हीसा आलेल्या पाकिस्तान महिलेला अटक केल्यानंतर चौकशीनंतर तिची पोलखोल झाली आहे. चौकशीत अनेक आश्चर्यकारक खुलासा झालाय. ही महिला एक महिन्यांची प्रेग्नंट आहे. सोमवारी चाँद हिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ही गोष्ट पुढे आलेय.

ANI | Updated: Aug 4, 2015, 07:04 PM IST
पाकिस्तानातून आलेल्या महिलेची पोलखोल  title=

जालंधर : जालंधरमधून विना व्हीसा आलेल्या पाकिस्तान महिलेला अटक केल्यानंतर चौकशीनंतर तिची पोलखोल झाली आहे. चौकशीत अनेक आश्चर्यकारक खुलासा झालाय. ही महिला एक महिन्यांची प्रेग्नंट आहे. सोमवारी चाँद हिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ही गोष्ट पुढे आलेय.

याआधी चाँदने सांगितले की, मला मूल नाही. त्यामुळे मी आग्रा येथील दरग्यात मूल व्हावे, यासाठी मन्नत मागण्यासाठी आली होती. तसेच जी ज्या मामाचे नाव सलमान सांगत होती. त्याचे खरे नाव रशीद असल्याचे पुढे आलेय.

मात्र, ही महिला भारतात कशासाठी आली होती, याचा खुलासा झालेला नाही. तिचा भारतात येण्यामागचा उद्देशही स्पष्ट झालेला नाही. लग्नाला पाच वर्षे झाली तरी मूल नसल्याने आग्रा येथील दरग्यात मन्नत मागण्यासाठी आल्याचे तिन सांगितले. या महिलेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.