आयलानची बॉडी उचलणाऱ्या पोलिसाला जबर धक्का

आयलान कुर्दी या तीन वर्षीय चिमुरड्यांच्या फोटोने अख्य जग हादरलं, त्या आयलानचा शव उचलणाऱ्या पोलिसाला जबर धक्का बसलाय. तो धक्क्यातून सावरलेला नाही. त्याला ही घटना आठवली की भीती वाटते.

Reuters | Updated: Sep 8, 2015, 08:52 AM IST
आयलानची बॉडी उचलणाऱ्या पोलिसाला जबर धक्का title=

इस्तांबूल : आयलान कुर्दी या तीन वर्षीय चिमुरड्यांच्या फोटोने अख्य जग हादरलं, त्या आयलानचा शव उचलणाऱ्या पोलिसाला जबर धक्का बसलाय. तो धक्क्यातून सावरलेला नाही. त्याला ही घटना आठवली की भीती वाटते.

तुर्कीतील प्रसिद्ध अंकारा बीचवर एक आपलं काळीज पिळवटून टाकणारं दृश्य दिसलं. सध्या सोशल मीडियावर या घटनेची खूप चर्चा झाली. जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. हा मुलगा कोण याची चर्चा होती. मात्र, त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनंतर जगालाच हादरा बसला. तुर्कीच्या समुद्र किनाऱ्यावर तीन वर्षांचा मुलगा आयलान याचा बुडून मृत्यू झाला होता. या निरागस चिमुरड्याच्या दुर्दैवी मृत्यूनं अख्खं जग हळहळलं. 

तुर्कीच्या समुद्र किनाऱ्यावर ३ वर्षीय सीरियन मुलाचा मृतदेह वाहून आला होता. मात्र, त्याच्या वडिलांनी केलेल्या खुलाशाने काळीज हेलावलेय. माझ्या हातातून मुलगा सटकला. ही घटना घडली त्यावेळी आम्ही नौकेतून यूनानला जात होतो. त्याचवेळी नौकेला अपघात झाला. यावेळी आयलान माझ्या हातातून सुटला. तो मदतीसाठी हाक देत होता. काळोखात काहीच दिसले नाही. त्यातचा जोराचा  वारा होता. त्यामुळे मी त्याला वाचवू शकलो नाही, अशी खंत त्याच्या वडिलांनी व्यक्त केली.

दरम्यान, तुर्कीमध्ये जलसमाधी मिळालेल्या चिमुरड्या आयलानला भारतानंही श्रद्धांजली वाहिली आहे. ओरिसामध्ये सुदर्शन पटनायक यांनी वाळूमध्ये आयलान याचं शिल्प साकारुन त्याला अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.