संसदेतील कम्प्युटरवरून २,४०,००० वेळा पाहिल्या पॉर्न साइट्स

भारतात पॉर्न साइट्सवर बंदी घातलण्यात आली आणि विऱोधानंतर मागे घेण्यात आली. पण भारताप्रमाणे ब्रिटनमध्येही पॉर्न साइट्सवरून खूप वादंग निर्माण झाला आहे. 

Updated: Aug 6, 2015, 04:47 PM IST
संसदेतील कम्प्युटरवरून २,४०,००० वेळा पाहिल्या पॉर्न साइट्स title=

लंडन : भारतात पॉर्न साइट्सवर बंदी घातलण्यात आली आणि विऱोधानंतर मागे घेण्यात आली. पण भारताप्रमाणे ब्रिटनमध्येही पॉर्न साइट्सवरून खूप वादंग निर्माण झाला आहे. 

भारतात विधानसभेत पॉर्न क्लिप्स पाहण्याच्या बातम्या येत असतात, तसेच ब्रिटनच्या संसदेत मंत्र्यांनी पॉर्न क्लिप्स पाहण्याची घटना आता वाद निर्माण करत आहे. चौकशीत असे निष्पन्न झाले की ब्रिटनच्या संसदेच्या कप्युटरमधून गेल्या वर्षात २ लाख ४० हजार वेळा पॉर्न साइट्सला भेट देण्यात आली आहे. 

सरकारी कम्प्युटर हे खासदारांसोबत त्याचे स्टाफदेखील वापरतात. त्यांना कम्प्युटर वापरण्यास बंदी आहे. माहितीच्या अधिकारात ही आकडेवारी समोर आली आहे. 

या आकडेवारीनुसार संसदेच्या कम्प्युटरमधून एप्रील २०१४ मध्ये ४२,००० व्हिजीट करण्यात आला आहे. एका दिवसात १३०० पेक्षा अधिक व्हिजीट करण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये संसदेच्या कम्प्युटरमधून ३० हजार पेक्षा अधिकवेळा पॉर्न कंटेंटच्या साइट्सला व्हिजीट करण्यात आली आहे. 

२०१३ मध्ये हा आकडा ३ लाख ५० हजार हिट्स इतका पोहचला होता. तज्ज्ञांच्यामते हे आकडे चक्रावणारे आहेत. 

या आकडेवारीवर हाउस ऑफ क़ॉमन्सचे प्रवक्ता विश्वास ठेवत नाही. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमरून यांनी पॉर्न साइट्सविरोधात कठोर धोरण अवलंबिणार असल्याचे सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.