मुंबई : उद्या आहे धनत्रयोदशी. या दिवशी सोने आणि चांदीची खरेदी करणे शुभकारक मानले जाते. मात्र केवळ सोने-चांदीच नव्हे तर इतरही काही वस्तू आहेत ज्यांची खरेदी तुम्हाला शुभकारक ठरु शकते.
भांडी - धनत्रयोदशीच्या दिवशी स्टील आणि पितळेची भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. जर तुमचे बजेट सोने-चांदीची खरेदी करण्याइतके नाहीये तर तुम्ही भांडी खरेदी करु शकता.
लक्ष्मी-गणेश मूर्ती - धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती खरेदी करणे शुभ असते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
झाडू- धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी केली जाते. यामुळे नकारात्मक उर्जा बाहेर फेकली जाते.
शंख - धनत्रयोदशीच्या दिवशी शंख आणावा आणि पूजेच्या वेळेस शंख वाजवावा. यामुळे लक्ष्मीचे घरात आगमन होते.
मीठ - या दिवशी मीठ खरेदी करावे. असं म्हटलं जात की या दिवशी मीठ खरेदी केल्याने धन आगमन होते तसेच घरात सुख-शांती कायम राहते.