फ्रॅंकफर्ट : जर्मनीत एका रोबोने एका कामगाराला उचलून आदळलं, यात कामगाराचा मृत्यू झाला आहे.
प्रसिद्ध फोक्सवॅगन कंपनीच्या उत्पादन विभागात एका स्वयंचलित रोबोने एका कामगाराला उचलून आदळलं.
कंपनीमध्ये रोबो बसविण्याचे काम सुरू असताना रोबोच्या हातात हा कामगार सापडला आणि आदळला गेला.
मोटारीचे विविध भाग बसविण्यासाठी या रोबोचा वापर करण्यात येतो.
मानवी चुकीमुळेच हा अपघात झाल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, मात्र रोबोकडून पहिल्यांदाच कामगाराची हत्या झाल्याची ही पहिली घटना आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.