www.24taas.com, न्यू यॉर्क
प्रत्येक कर्मचारी हा पगार वाढण्याची अगदी आतुरतेने वाट बघत असतो आणि पगार वाढला की त्याचा आनंद हा गगनात मावेनासा होतो, पण हा आनंद काही क्षणांसाठीच असल्याचे एका निष्कर्षातून समोर आले आहे.
इलीनॉयस युनिर्व्हसिटीच्या अमित क्रामर यांनी दिलेल्या माहितीनुसार एकदा पगार वाढला की. अगदी दुसया दिवसापासून कर्मचा-यांचे राहणीमान उंचावायला लागते.
त्यामुळे पैसे अपुरे पडतात आणि त्यानंतर ते आपल्यापेक्षा जास्त पगार असलेल्या सहाकार्याएवढा पगार आपला का नाही असा विचार करून ते अधिक दु:खी होत असतात.