स्कॉटिश राणीच्या नेतृत्वातून मुक्त होणार?

एकेकाळी ज्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नसे, तो ग्रेट ब्रिटन (यूके) आज फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. युनायडेट किंगडममधून बाहेर पडण्यासाठी स्कॉटलंडमध्ये आज सार्वमत घेतलं जाणार आहे. स्कॉटिश जनता परंपरेला चिकटून ब्रिटनमध्येच राहणं पसंत करते, की राणीच्या नेतृत्वातून मुक्त होते, हा या मतदानाच्या निकालावर ठरणार आहे.

Updated: Sep 18, 2014, 12:25 PM IST
स्कॉटिश राणीच्या नेतृत्वातून मुक्त होणार?   title=

लंडन : एकेकाळी ज्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नसे, तो ग्रेट ब्रिटन (यूके) आज फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. युनायडेट किंगडममधून बाहेर पडण्यासाठी स्कॉटलंडमध्ये आज सार्वमत घेतलं जाणार आहे. स्कॉटिश जनता परंपरेला चिकटून ब्रिटनमध्येच राहणं पसंत करते, की राणीच्या नेतृत्वातून मुक्त होते, हा या मतदानाच्या निकालावर ठरणार आहे.

स्कॉटलंड बाहेर पडल्यास पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांचं सरकारही धोक्यात येणार आहे. पोटनिवडणुकीमध्ये ‘इंडिपेंडन्स पक्ष' विजयी झाला, तर कॅमेरून यांच्या अडचणीत आणखी भर पडू शकते.  या सार्वमताच्या पार्श्वभूमीवर फाळणी टाळण्यासाठी ब्रिटिश सरकार आणि नागरिकांनी स्कॉटलंडला बाहेर न पडण्याचं आवाहन केलंय. 

दुसरीकडे स्कॉटलंडमधल्या नेत्यांनी मात्र स्वातंत्र्याच्या बाजूनं कौल देत शतकांमधून एखादवेळी येणारी संधी साधण्याची साद जनतेला घातलीय. स्कॉटिश नॅशनल पार्टीनं बराक ओबामांची ‘येस वुई कॅन' या घोषणेची उसनवारीच आपल्या कॅम्पेनसाठी केलीय. आजचं सार्वमत हे राष्ट्रीय सक्षमीकरणाची प्रक्रिया असेल. स्कॉटिश जनता आपली नियती स्वत:च ठरवणार आहे, असं स्वातंत्र्यवादी नेते अॅसलेक्स सॅलमंड यांनी म्हटलंय. ब्रिटिश मीडियानुसार ९७ टक्के मतदारांनी मतदानासाठी नोंदणी केलीय.

‘युनायटेड किंगडम’चा पसारा...
'युनायटेड किंगडम'मध्ये चार प्रांतांचा समावेश होतो. यात इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडचा समावेश होतो. या सर्व देशांची मिळून लोकसंख्या ही सहा कोटी 40 लाखांपेक्षाही अधिक आहे. युनायटेड किंगडममध्ये (ग्रेट ब्रिटन) घटनात्मक राजेशाही असून, त्यांनी राज्य कारभारासाठी संसदीय व्यवस्थेचा स्वीकार केलाय. ‘युनायटेड किंगडम'ची राजधानी लंडन असून, सहा फेब्रुवारी 1952 पासून ब्रिटनच्या महाराणीचे नेतृत्व ग्रेट ब्रिटनने मान्य केलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.