लाहोर : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या काही मंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झालाय.
30 ऑगस्टला झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किमान 3 निदर्शक ठार तर 500 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.
पाकिस्तान आवामी तेहरीक पक्षाचे नेते धर्मगुरू ताहिर ऊल काद्री यांच्या याचिकेवर कोर्टानं तक्रार दाखल कऱण्याचे आदेश दिलेत. शरीफ यांच्यावर दाखल झालेला हा दुसरा खुनाचा गुन्हा आहे.
गेल्या महिन्यात लाहोरमध्ये काद्री यांच्या 17 समर्थकांच्या मृत्यू प्रकरणीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.