बैरुत: आत्तापर्यंत पत्रकार, सैनिकांची हत्या करणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेनं इस्रायलचा गुप्तहेर असल्याचा आरोप ठेवत एका तरूणाची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यासाठी त्यांनी एका लहान मुलाचा वापर केला आहे.
इसिसतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एक व्हिडिओमध्ये एक अल्पवयीन मुलगा नागरिकाच्या डोक्यात गोळ्या घालून त्याला ठार करत असल्याचं दिसत आहे.
मोहम्मद सईद इस्माइल मुसल्लम असं त्या ठार केलेल्या बंधकाचं नाव असून तो इस्रायलचा गुप्तहेर असल्याचा आरोप इसिसनं केला आहे.
Breaking: #ISIS limitless immorality released a vid shows a child executing alleged Israeli spy Mohammad Ismail. pic.twitter.com/NXwoOtkQPV
— Rita Katz (@Rita_Katz) March 10, 2015
b
सुमारे १३ मिनिटे कालावधीच्या या व्हिडिओत ठार करण्यात आलेल्या तरूणानं केशरी रंगाचे कपडे परिधान केलेले दिसत आहेत. त्याच्यामागेच अल्पवयीन मुलगा उभा असून त्यानं त्या बंधकाच्या डोक्यात गोळी घालून त्याची हत्या केल्याचं दिसतंय.
मुसल्लमच्या कुटुंबियांनी मात्र तो गुप्तहेर नसल्याचं सांगितलं आहे. या व्हिडिओच्या अधिकृततेची खात्री अद्याप पटली नसल्याचं इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.