www.24taas.com, झी मीडिया, काबूल
अफगाणिस्तान दहशतवादी हल्ल्याची बातमी येतेय. काबुलमध्ये राष्ट्रपती भवनाबाहेर स्फोट झालेत. राष्ट्रपती हमीद करजई यांच्या घराबाहेरून फायरिंगचे आवाजही येत होते.
अमेरिका आणि तालिबानदरम्यान सुरु असलेल्या शांतीवार्तावर राष्ट्रपती हमीद करजई यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर आज सकाळी साडे सहाच्या सुमारास दहशतावाद्यांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती निवासस्थानाच्या गेटवर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी अद्यापही या घटनेला दुजोरा दिला नाही. हल्ला झाला त्यावेळ राष्ट्रपती करजई आपल्या निवासस्थानात होते किंवा नाही? हेही अजून समजू शकलेलं नाही. करजाई आणि अमेरिकन सुरक्षारक्षकांमध्ये चकमक झाल्याचंही वृत्त आहे.
काबूलमध्ये स्फोट आणि गोळीबारासारख्या घटनांना पुन्हा एकदा सुरुवात झालीय. पोलिसांनी हा हल्ला दहशतवाद्यांकडूनच झाल्याचं कबूल केलं असलं तरी या घटनेबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.