VIDEO : मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याचं 'तौबा... तौबा' वार्तांकन वायरल!

भारत - पाकिस्तानच्या ताणल्या गेलेल्या संबंधांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी अचानक पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना 'सरप्राईज' भेट दिली. यावर विविध चर्चाही झाल्या... वेगवेगळे मुद्देही उपस्थित करण्यात आले. 

Updated: Dec 26, 2015, 02:07 PM IST
VIDEO : मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याचं 'तौबा... तौबा' वार्तांकन वायरल! title=

मुंबई : भारत - पाकिस्तानच्या ताणल्या गेलेल्या संबंधांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी अचानक पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना 'सरप्राईज' भेट दिली. यावर विविध चर्चाही झाल्या... वेगवेगळे मुद्देही उपस्थित करण्यात आले. 
 
जशी या घटनेची चर्चा तावातावने भारतात झाली तशीच ती पाकिस्तानातही होणं साहजिकच... आणि त्यावर वेगवेगळे मुद्दे उपस्थित होणं हेदेखील साहजिकच... 

अधिक वाचा - पंतप्रधान मोदींची 'बर्थ डे डिप्लोमसी' भारत-पाक संबंधांच्या पथ्यावर?

नवाझ शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला लाहोरमध्ये मोदी अचानक दाखल झाले... याच घटनेचं पाकिस्तानच्या एका वार्ताहरानं 'तौबा...तौबा' म्हणत केलेलं वार्तांकन सध्या सोशल वेबसाईटवर भलतच व्हायरल झालंय.... पाहा... 

 

Tauba Tauba :D

Posted by Ali Moeen Nawazish on Friday, December 25, 2015