धक्कादायक: वर्गमित्राच्या हत्येनंतर विद्यार्थ्याची मृतदेहासोबत सेल्फी

शाळकरी मुलानं वर्गमित्राची हत्या केल्यानंतर मृतदेहासोबत सेल्फी काढल्याची भयंकर घटना अमेरिकेत घडली. रियान मॅन्गन (१६), असं मृताचं नाव असून, आरोपी मुलानं रियानच्या चेहऱ्यावर गोळी मारली. जिन्नेट्टे, पेनिसेल्विनिया इथं बुधवारी ही घटना घडली. या घटनेनं अमेरिका थरारून गेली आहे.

Updated: Feb 11, 2015, 06:09 PM IST
धक्कादायक: वर्गमित्राच्या हत्येनंतर विद्यार्थ्याची मृतदेहासोबत सेल्फी title=

वॉशिंग्टन : शाळकरी मुलानं वर्गमित्राची हत्या केल्यानंतर मृतदेहासोबत सेल्फी काढल्याची भयंकर घटना अमेरिकेत घडली. रियान मॅन्गन (१६), असं मृताचं नाव असून, आरोपी मुलानं रियानच्या चेहऱ्यावर गोळी मारली. जिन्नेट्टे, पेनिसेल्विनिया इथं बुधवारी ही घटना घडली. या घटनेनं अमेरिका थरारून गेली आहे.

आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. रियानची त्याच्या घरीच हत्या केल्यानंतर आरोपीनं त्याच्या मृतदेहासोबत सेल्फी घेतली आणि एका विशेष मोबाईल अ‍ॅपद्वारे (या अ‍ॅपद्वारे पाठविण्यात आलेले संदेश सेव्ह न केल्यास काही सेकंदांत ते आपोआप डिलीट होतात.) ती दुसऱ्या एका मित्राला पाठविली. 

आरोपीनं ही सेल्फी ज्या मित्राला पाठविली होती. त्याच्या आईनं ती तात्काळ सेव्ह करून पोलिसांना त्याविषयी कळविलं. आरोपीवर खुनासह शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियानवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. (वृत्तसंस्था) 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.