रस्त्यावर धावणारी कार हवेत उडणार, लवकरच आपल्या भेटीला

हवेत उडणाऱ्या कारची कल्पना तुम्ही नक्कीच कधी ना कधी केलीच असेल. मात्र आता तुमच्या स्वप्नातली ही फ्लाईंग कार प्रत्यक्षात अवतरणार आहे. 

Reuters | Updated: Aug 30, 2016, 09:40 AM IST
रस्त्यावर धावणारी कार हवेत उडणार, लवकरच आपल्या भेटीला title=

वॉशिंग्टन : हवेत उडणाऱ्या कारची कल्पना तुम्ही नक्कीच कधी ना कधी केलीच असेल. मात्र आता तुमच्या स्वप्नातली ही फ्लाईंग कार प्रत्यक्षात अवतरणार आहे. 
रस्त्यावर वेगाने धावणारी. सुस्साट वेगाची. ही आहे तीनचाकी कार. 

ही कार सुस्साट पळते आणि सुस्साट वेगात धावते. आणि कारने चक्क टेक ऑफ घेते. हिला कार म्हणा की उडणारं विमान. किंवा अगदी सोप्या शब्दात तुम्ही तिला उडणारी कारही म्हणू शकता. 

या कारमुळं रस्त्यावर धावणाऱ्या आणि हवेत उडणाऱ्या कारमधून प्रवास करण्याचं तुमचं स्वप्न लवकरच साकार होईल. डच कंपनी पाल व्ही वननं या कारला बनवले आहे. या कारचं नाव आहे पाल व्ही वन हेलिसायकल. 2017 पर्यंत ही कार लॉन्च होईल. या कारची वैशिष्ट्य तुम्हालाही थक्क करतील.

पाल व्ही वन कार 27 गॅलन क्षमता असलेल्या पेट्रोलच्या टाकीमुळं साडेसातशे मैलाचा प्रवास करु शकते. शिवाय या टाकीमुळं कारला 220 मीटर उड्डाण भरण्याची क्षमताही मिळते.. 28 लिटर पेट्रोलमधून ही कार एका तासाचं उड्डाण करु शकते तर एवढ्याच पेट्रोलमधून ही कार रस्त्यावर 12 किमीचं अंतर पार करु शकते. यात 230 हॉर्सपावर क्षमतेचं 4 सिलिंडरचं इंजिन आहे. ही कार जमीनीवर उतरवण्यासाठी 540 फूट रनवेची गरज असते. आकारानं छोटी असल्याने पाल व्ही वन छोट्याशा जागेतही पार्क होऊ शकते.

रस्त्यावर धावतानाही या कारचा प्रवास आरामदायी आहे. यांत असलेल्या टिल्टिंग सिस्टीममुळं बाईकप्रमाणे वेडी वाकडी वळणं घेऊन चालवणंही शक्य आहे. हवेत उड्डाण करायचं असेल तर जवळच्या विमानतळावर जा आणि एक बटन प्रेस करा.. कारच्या वरच्या बाजूला गाललेले रोटर आणि डॅन अनफोल्ड होऊन बाहेर येतील आणि नजरा झुकतात न झुकतात तोच ही कार हवेत उडू लागेल.

चार हजार फूट उंच उडण्याची या कारची क्षमता आहे. एअर ट्रॅफिक नियमांनुसार चार हजार फूटांपेक्षा खालील विमान उड्डाणांवर बंदी आहे. त्यामुळं एखाद्या विमानाशी या कारची टक्कर होण्याची शक्यताच नाही.. ही कार चालवण्यासाठी तु्म्हाला कारच्या लायसन्सह पायलट सर्टिफिकेटही लागू शकते. 

काही कारणांमुळे याचं इंजिन फेल झाल्यास कार जमिनीवर कोसळणार नाही. यात असलेल्या गायरोप्लेन तंत्रज्ञानामुळे यातील रोटर फिरतच राहिल आणि सुरक्षितरित्या तुम्ही खाली उतरू शकता. पाल व्ही वनला जमिनीवर हवेत आणि हवेतून जमिनीवर येण्यासाठी अवघी दहा मिनिटे लागतात. 

सध्या डच कंपनी एकूण 90 पाल वी वन बनवत आहे. यातील 25 उत्तर अमेरिकेत पाठवण्यात येणार आहेत. या एका कारची किंमत 4 कोटींपेक्षा अधिक असू शकते.