काबूल तीन बॉम्बस्फोटाने हादरले, स्फोटात 24 ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलचा मध्यवर्ती ठिकाणी रात्रीच्या सुमारास तीन बॉम्बस्फोटाने हादरले. आधीच्या दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटात 24 जण ठार झाले होते. तर 91हून अधिक नागरिक जखमी झालेत.

PTI | Updated: Sep 6, 2016, 08:36 AM IST
काबूल तीन बॉम्बस्फोटाने हादरले, स्फोटात 24 ठार title=

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलचा मध्यवर्ती ठिकाणी रात्रीच्या सुमारास तीन बॉम्बस्फोटाने हादरले. आधीच्या दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटात 24 जण ठार झाले होते. तर 91हून अधिक नागरिक जखमी झालेत.

स्फोटानंतर दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी स्वत:ला उडवून दिले. संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाजवळ हे तिन्ही स्फोट करण्यात आले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी तालिबान या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी या बॉम्बस्फोटाचा तीव्र शब्दात निषेध केलाय. बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी मदतीची घोषणा केली आहे.

या स्फोटानंतर पाकिस्तानला अफगाणिस्तानने सुनावले. अफगाणिस्तानच्या शत्रू राष्ट्रांमध्ये सुरक्षा आणि संरक्षण दलांच्या माध्यमातून लढण्याची क्षमता नसल्याने, अशा प्रकारे बॉम्बस्फोट घडवण्याची कृत्ये ते करतात असे राष्ट्रपीत गनी यांनी म्हटले.