टोकियो : आपल्या देशातील अनेक भागांमध्ये मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मैलोन मैल चालावे लागते. मात्र जपानमध्ये चक्क एक ट्रेन दररोज केवळ एका विद्यार्थ्यीनीला शाळेत पोहोचवण्यासाठी ये-जा करते.
जपानच्या उत्तर होकाइदो द्वीपच्या कामी-शिराताकी गावांमध्ये पुरेशा प्रमाणात ये-जा करणारे प्रवासी नसल्याने हे रेल्वे स्टेशन बंद करावे लागले. मात्र सरकारने हे स्टेशन चालू करण्याचा निर्णय घेतलाय. येथील विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी दुसरे कोणतेही वाहतुकीचे साधन नसल्याने सरकारने हा निर्णय घेतलाय.
विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी दोन वेळा येथे ही ट्रेन येते. एका विद्यार्थ्यीनीव्यतिरिक्त या ट्रेनमध्ये कोणी चढत नाही. इतकेच नव्हे तर या ट्रेनची वेळही शाळेच्या वेळेनुसार बदलण्यात आलीये.
या विद्यार्थ्यिनीच्या हायस्कूल शिक्षणापर्यंत ही ट्रेन सेवा सुरु राहणार आहे. त्यानंतर ही सेवा बंद केली जाणार आहे.