रशियाच्या राष्ट्रपतींसमोर जर्मन महिलांचं `अर्धनग्न` निदर्शन

जर्मनीच्या दौऱ्यावर असलेल्या रशियाचे राष्ट्रापती ब्लादिमीर पुतीन यांना हनोव्हर मध्ये एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. हनोव्हर येथे पुतीन यांच्या समोर काही महिलांनी टॉपलेस होत अश्लिल घोषणा दिल्या.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 9, 2013, 04:06 PM IST

www.24taas.com, हनोव्हर
जर्मनीच्या दौऱ्यावर असलेल्या रशियाचे राष्ट्रापती ब्लादिमीर पुतीन यांना हनोव्हर मध्ये एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. हनोव्हर येथे पुतीन यांच्या समोर काही महिलांनी टॉपलेस होत अश्लिल घोषणा दिल्या.
पुतिन हनोव्हर येथे जर्मन चॅन्सेलर अँजेल मार्केल यांच्यासोबत ट्रेड फेयरला जाणार होते. मात्र या विरोधी प्रदर्शनामुळे त्यांना दौरा रद्द करावा लागला. पुतीन आणि अँजेला एका औद्योगिक मेळाव्यात फोक्सवॅगनची कार पाहात असताना त्यांच्यासमोर एकमहिला आली आणि तिने अंगावरचे कपडे काढले. तिच्या पाठीवर विविध घोषणा लिहिल्या होत्या. तिच्यासोबत असलेल्या महिलांनीदेखील टॉपलेस होत घोषणाबाजी केली. ‘पुतीन हुकुमशाहा’ असल्याच्या त्यांनी घोषणा दिल्या. पोलिसांनी या महिलांना तात्काळ अटक केलं. या महिला अमिनाच्या समर्थनार्थ निदर्शन करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

या अर्धनग्न निदर्शनांबद्दल पुतीन यांना विचारलं असता पुतीन यांनी ‘हे निदर्शन छान वाटलं’, अशी प्रतिक्रिया दिली. राजकीय निदर्शनं कपडे घालून केल्यास जास्त प्रभावी ठरतात. लोकांनी नग्न होण्यासाठी न्युडिस्ट बीचसारखी दुसरी जागा निवडायला हवी. अशी प्रतिक्रिया पुतीन यांनी दिली.