www.24taas.com, मुंबई
मुंबई लक्ष्मीपुत्रांसाठी बनलेली मायानगरी आहे, असं म्हटलं तर आता वावगं ठरायला नको. कारण, तब्बल २६ अब्जाधीशांना समावून घेणाऱ्या या शहरानं याबाबतीत शांघाय, पॅरिस आणि लॉस एन्जेलिस यांसारख्या शहरांनाही मागे टाकलंय आणि जगातील सर्वाधिक अब्जाधीशांच्या शहरांमध्ये ‘टॉप १०’मध्ये जागा मिळवलीय.
होय, जगातील सर्वाधिक अब्जाधीश असणाऱ्या `टॉप १०` यादीत मुंबईनं सहावा क्रमांक मिळवलाय. जगभरातील श्रीमंत, अतिश्रीमंत आणि त्यांच्या संपत्तीचा अभ्यास करणाऱ्या `वेल्थइनसाइट` या एजन्सीच्या अहवालात ही नोंद करण्यात आलीय.
या यादीत पहिला क्रमांक लागतो तो न्यूयॉर्क शहराचा... न्यूयॉर्कमध्ये ७० अब्जाधीश वसल्याची नोंद या अहवालात करण्यात आलीय. त्यानंतर मॉस्कोमध्ये ६४, लंडनमध्ये ५४, हाँगकाँगमध्ये ४० आणि बिजिंगमध्ये २९ अब्जाधीश वसलेले आहेत, असं या अहवालात म्हटलंय. त्यानंतर लागतो तो मुंबईचा नंबर. येत्या काही काळात मुंबईनं यापेक्षा अधिक वरचं स्थान पटकावलं तर कुणालाही आश्चर्य वाटायला नको. महत्त्वाचं म्हणजे, भारतीतल फक्त एकाच शहराचा या यादीत समावेश करण्यात आलाय... ते म्हणजे भारताची आर्थिक राजधानी... मुंबई.
मुंबईनंतर नंबर लागतो तो शांघायचा... शांघायमध्ये २३, पॅरिसमध्ये २२ आणि लॉस एन्जेलिसमध्ये १९ अब्जाधीशांची नोंद करण्यात आलीय.
कोट्याधीशांच्या यादित टोकियोनं पहिला क्रमांक पटकावलाय. इथं तब्बल ४.६ लाख जण कोट्यधीश आहेत. कोट्याधीशांच्या यादीत भारताचा देश म्हणून अकरावा क्रमांक लागतो. एक लाखांपेक्षा अधिक कोट्यधीश असलेल्या शहरांची संख्या अकरा एवढी आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.